सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या वृद्धावर कारवाई
दापोली : तालुक्यातील भिवबंदर रोड वणौशीतर्फे पंचनदी येथे एका वृद्धावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अरुण गोविंद मोरे (६८) असे या वृद्धाचे नाव आहे.
दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण मोरे गुरुवारी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास दाभोळ येथील आयटीआयच्या पाठीमागे वणौशीतर्फे पंचनदी येथे मद्यप्राशन करताना आढळला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.