दापोलीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या वुध्दाविरोधात गुन्हा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील भिवबंदर रोड आयटीआयच्या मागे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या वुध्दाविरोधात दाभोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 11 डिसेंबर रोजी दुपारी 12.10 वा.सुमारास करण्यात आली आहे.
अरुण गोविंद मोरे (68,रा.भिवबंदर,वणौशी तर्फे पंचनदी,दापोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल निलेश खोपडकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी दुपारी संशयित हा त्या ठिकाणी दारु पिण्यासाठी बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाण्ो गुन्हा दाखल करण्यात आला आहे.