चिपळूण पालिका इमारतीसाठी ३० कोटीची मागणी
चिपळूण ः मोडकळीस आलेल्या चिपळूण पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ३० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात करताना प्रलंबित विकासकामांच्या मुद्द्यांना हात घातला. ब्रिटिशकालीन चिपळूण पालिकेच्या इमारतीची दुरवस्था झाली असल्याने नव्या इमारतीसाठी ३० कोटींच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली. चिपळूण शहरासाठी १५३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीबद्दल निकम यांनी सभागृहात शासनाचे आभार मानले.