प्रौढाने मद्याच्या नशेत मुंग्यांची पावडर खाल्ली
रत्नागिरी,: मद्याच्या नशेत मुंग्या मारण्याची पावडर प्रौढाने खाल्ली. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. राजेश शंकर सनगरे (वय ५६, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मुंग्याची पावडर खाल्लेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ९) दुपारी ३ च्या सुमारास मुरुगवाडा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेश सनगरे यांनी मद्याच्या नशेत मुंग्या मारण्याची पावडर खाल्ली. अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.