मेर्वी येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा
पावस ः तालुक्यातील मेर्वी येथील रामण्णा जंगलमय भागात दगडी बांधाच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई २१० रुपयांची एक लिटर दारु जप्त केली. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. विजय दत्ताराम माईन (वय ४०, रा. बंडबेवाडी, कुर्धे, पो. मेर्वी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) सायंकाळी साडेचारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना हातभट्टीची २१० रुपयांची एक लिटर दारु विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संजय शिवगण यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.