दारू पिण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळला
चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण तालुक्यातील नांदगाव गावकरवाडी येथील दारू पिण्याची सवय असलेला सिताराम तानु मोहिते (वय ५६) हा दिनांक ०२/१२/२०२५ रोजी सकाळी ७.०० वाजल्यापासून दारू पिण्याकरिता घरातून बाहेर पडला. मात्र तो परत घरी आला नाही.
त्याच्या मृत्यूची घटना दिनांक ०३/१२/२०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्याचा जावई काशीराम हरेकर आणि वाडीतील इतर लोकांनी त्याचा शोध घेत असताना, तो नांदगाव गावकरवाडीच्या बाहेरून आंबेपाल येथून गेलेल्या कॅनलच्या पुलाखाली मृतावस्थेत मिळून आला.
या घटनेनंतर, त्याचा जावई काशीराम हरेकर याने सावर्डे पोलीस ठाण्यात खबर दिली. सावर्डे पोलिसांनी या घटनेची नोंद दिनांक ०३/१२/२०२५ रोजी अकस्मात मृत्यू क्रमांक २७/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.