बोट बुडून बेपत्ता झालेल्या मच्छीमाराचा मृतदेह सापडला
पावस ः तालुक्यातील गावखडी येथील खाडीत बोट बुडाल्याने मच्छीमार पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. त्यांचा मृतदेह सोमवारी (ता. १) सकाळी बिरजेवाडी परिसरात आढळला. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला उत्तरीय तपासणीनंतर देह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
असलम युनूस पेजे (वय ५६) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३०)नोव्हेंबरला घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी असलम पेजे यांनी गावडे आंबेरे येथील एका मच्छीमाराकडे फोन करून तुझ्याकडे मच्छी उपलब्ध आहे का अशी विचारणा केले होती. त्यांनी मच्छी आहे असे सांगितल्यानंतर पेजे दुपारी आपली बोट घेऊन गावडे आंबेरे च्या दिशेने निघाले होते. खाडीच्या पाण्यात मध्येच बोटीचा वलवा पाण्यात पडल्यामुळे बोट चालवणे कठीण झाले. त्यानी काढण्यासाठी पाण्यात उडी टाकले आणि वरती घेऊन येत असताना बोट बाजूला सरकल्यामुळे त्याला बोटीमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यामुळे ते पुन्हा पाण्यामध्ये गेले त्यानंतर तो परत वरती आले नाहीत. त्यादरम्यान गावडे आंबेरे येथील मच्छीमार बोट पेजे अजून का नाही आले म्हणून गावकरीच्या दिशेने निघाले असता त्याला फक्त बोट दिसली. त्यांनी मच्छीमारांना खबर दिली तेथील मच्छीमारांनी शोधा शोध केली. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह बिरजेवाडी परिसरात दिसला. मृतदेह किनाऱ्यावर आणून रत्नागिरी शासकीय रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. सायंकाळी पाच वाजता त्यांचा मृतदेहावर गावखडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. असलम पेजे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे