रत्नागिरीत प्रभाग १० मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीला स्थगिती
२० डिसेंबरला होणार मतदान; फक्त नगराध्यक्षपदासाठीच होणार मतदान
रत्नागिरी:-
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक पदाच्या दोन्ही जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपिलामुळे ही निवडणूक प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली असून, आता या प्रभागात नगरसेवक पदासाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
ज्या ठिकाणी नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते, त्याच प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरीतील अन्य प्रभागात होणारी नगर परिषदेची निवडणूक प्रभाग १० साठी पूर्णपणे लागू होणार नाही.
नगराध्यक्ष पदासाठी मतदान कायम
या बदलामुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये फक्त नगराध्यक्ष पदासाठीचे मतदान प्रक्रिया नियोजित वेळेत होणार आहे. नगरसेवक पदाचे मतदान मात्र पुढे ढकलले आहे.
प्रभाग १० मध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता २० डिसेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे. या तारखेला या प्रभागात नगरसेवक पदाच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचे प्रशासनाकडून समजते.