सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ; वृद्धाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील कोतवडे-सनगरे स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वृद्धा विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बाबू ठोंबरे (वय ६४, रा. कोतवडे, सनगरेवाडी, रत्नागिरी) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) सायंकाळी साडेसहा च्या सुमारास कोतवडे सनगरे स्टॉप रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध सुरेश ठोंबरे हे सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार मनोज पावसकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.