नगर राजभाषा कार्यान्वयन समितीची बैठक उत्साहात
रत्नागिरी, :- रत्नागिरी शहरातील केंद्र सरकारी कार्यालयामध्ये राजभाषा हिंदीचा प्रचार प्रसार करण्यासाठी गृह मंत्रालय, राजभाषा विभाग ने नगर राजभाषा कार्यान्वयन समितीची स्थापना केली आहे व समितीच्या आयोजनाचे कार्य बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालयास दिले आहे. समितीची प्रत्येक सहा महिन्याने सभा आयोजित केली जाते.
सभेला प्रमुख अतिथी म्हणून गृह मंत्रालय राजभाषा विभागाकडून सहाय्यक निदेशक प्रमोद सांगोळे उपस्थित होते. त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया, प्रधान कार्यालयातून सुश्री मऊ मैत्रा, सहायक महाप्रबंधक उपस्थित होते.
श्री. देवरे यांनी सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या आंतरिक कामकाजामध्ये हिंदीचा अधिकाधिक वापर करावा व केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करावे व ग्राहक तथा जनते संबंधी कामकाजात क्षेत्रीय भाषा म्हणून मराठी भाषेचा वापर करावा असे सांगितले.
समिती द्वारा प्रत्येक हिंदी दिवस, हिंदी पखवाडा व विश्व हिंदी दिवसाचे आयोजन केले जाते. दोन वर्षापासून हिंदी कवी संमेलन व क्रिकेट टुर्नामेंटचे सुद्धा आयोजन केले जाते. समिती मध्ये 30 केंद्र सरकारी कार्यालये एकत्रित कार्य करतात. समिती द्वारा सहामाही हिंदी पत्रिका राजभाषा रत्नसिंधु चे ही प्रकाशन केले जाते. सदर बैठक न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे संमेलन कक्षात संपन्न झाली. बैठकीचे आयोजन कार्य संपादक तथा सदस्य सचिव रमेश गायकवाड यांनी पाहिले.याचवेळी पुरस्कार वितरण करण्यात आले व मंच संचालन कोंकण रेल्वेचे संतोष पाटोळे यांनी केले.