रत्नागिरीत 75 वा भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांचे आयोजन
रत्नागिरी: दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा तालुका शाखा रत्नागिरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 75 वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. भारतीय संविधानाची पुस्तिका यांचे पुष्पवृष्टी करून सन्मान करण्यात आला. त्रिशरण पंचशील पठण करण्यात आले.
या वेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा महासचिव बी. के. कांबळे साहेब यांनी भारतीय संविधानाची प्रस्ताविका वाचून शपथ दिली. त्यानंतर मुकुंद कांबळे, अभिजित तांबे, शिवराम कदम, अस्मिता कांबळे, स्मिता कांबळे, दत्ताराम कांबळे, दिपक जाधव, एल व्ही. पवार आणि कुमार आयुष अभिजित तांबे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास एल. व्ही. पवार, शिवराम कदम, बी. के. कांबळे, प्रभाकर जाधव, दिपक जाधव, मुकुंद कांबळे, अभिजित तांबे, दत्ताराम कांबळे, स्मिताताई कांबळे, अस्मिता कांबळे, दिपाली जाधव, संतोष कांबळे, राकेश कांबळे, गणपत ताम्हणकर, आदी मान्यवर उपस्थित होते.