साटवली वळणावर दोन एस.टी. बसची जोरदार धडक
संगमेश्वर: लांजा एस.टी. आगाराच्या दोन बसमध्ये आज सकाळी साटवली येथील अवघड वळणावर अपघात झाला. लांजा इसवली आणि लांजा शेळवी या दोन मार्गांवरील बसची समोरासमोर धडक झाली.
हा अपघात सकाळी सुमारे १० वाजता घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.