वाकवलीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोली : तालुक्यातील वाकवली मराठवाडी येथे राहणारी साक्षी सचिन देवरुखकर या ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२६ च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी देवरुखकर हिला २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ च्या दरम्यान उलटी झाली. तिला उलटीचा त्रास जास्त होत असल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.