सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड येथील खाडी किनारी झुडपाजवळ मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. प्रसाद भालचंद्र खेऊर (वय ५५, रा. भंडारवाडा, मालगुंड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मालगुंड खारभूमी मैदानाशेजारील खाडी किनारी झुडपाजवळ निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित प्रसाद खेऊर हा मद्यपान करण्याच्या उद्देशाने सापडला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल निलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.