टेभ्येपूल ते हातिस रोडवर अवैध दारू विक्रीवर कारवाई
रत्नागिरी, : तालुक्यातील टेभ्येपूल ते हातिस जाणाऱ्या रस्त्यावर आंब्याच्या झाडाखाली विनापरवाना हातभट्टीच्या दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ५०० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास चौसोपीवाडी येथील रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला या झाडाखाली विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगलेल्या स्थितीत सापडल्या. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रिया सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.