डिसेंबरमधील लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द
रत्नागिरी, :- राज्य निवडणूक आयोगाकडील 4 नोव्हेंबर 2025 सोबतच्या सहपत्रानुसार राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 6 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 6 नोव्हेंबर 2025 पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 3 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे माहे डिसेंबर 2025 मधील 1 डिसेंबर 2025 रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आचारसंहिता असल्याने होणार नाही. नागरिकांना याची नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.
जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे डिसेंबर 2025 चा लोकशाही दिन 1 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत होणार होता तथापि निवडणूक आचारसंहितेमुळे सदर लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.