रत्नागिरीत हाडांच्या ठिसुळपणा तपासणीचे मोफत शिबीर!
रत्नागिरी: सध्याच्या धावपळीच्या जीवनात सांधेदुखी, कंबरदुखी आणि हाडांचा ठिसुळपणा यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. नीलेंद्र भोळे यांच्यातर्फे भोळे हॉस्पिटल, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे गुरुवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी हाडांचा ठिसुळपणा मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष शिबिरामध्ये रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे हाडांच्या खनिजाची घनता तपासणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याची तपासणी मोफत केली जाईल. हा स्कॅन हाडांचा ठिसुळपणा आणि भविष्यातील फ्रॅक्चरचा धोका अचूकपणे दर्शवतो. शिबिराची वेळ: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे.
शिबिरात डॉ. नीलेंद्र भोळे स्वतः उपस्थित राहून अस्थिरोग तज्ञांकडून रुग्णांना मोफत सल्ला देतील. ज्या रुग्णांना खालील समस्या आहेत, त्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा:मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखी, संधीवात आणि फ्रोजन शोल्डर, हाडांचा ठिसुळपणा (ऑस्टिओपोरोसिस), सांधा मुरगळणे,खेळताना झालेल्या दुखापती मणक्याचे आजार आणि शिरांचे आजार या तपासण्या होणार आहेत.रुग्णांनी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी भोळे हॉस्पिटल, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे संपर्क साधावा किंवा डॉ. नीलेंद्र भोळे (MS ORTHO): 7387442737 या क्रमांकावर संपर्क साधावा.