मेढे येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः मेढे (ता. संगमेश्वर) येथे गावठी हातभट्टीच्या दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई ५०० रुपयांची पाच लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भगवान आबा देसाई (वय ७२, रा. देसाईवाडी मेढे तर्फे फुणगूस, ता. संगमेश्वर) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) दुपारी अडीचच्या सुमारास मेढे फाटा पासून ५० मिटर अंतरावरील रस्त्याच्या बाजूला झुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध भगवान देसाई यांच्याकडे विनापरवाना ५०० रुपयांची पाच लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मिथुन मस्कर यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.