कोल्हापूर विभागीय शासकीय बेसबॉल स्पर्धेसाठी ‘न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे’चा संघ रवाना!
रत्नागिरी : न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील अंडर-१४ (मुली) आणि अंडर-१७ (मुले) या गटातील संघांनी कोल्हापूर विभागीय शासकीय बेसबॉल स्पर्धेसाठी शानदार तयारी करून आज (सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५) कोल्हापूरकडे प्रस्थान केले. ही स्पर्धा उद्या, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी आदर्श गुरुवर्य पेडगाववाडी, ता. हातकणंगले येथे होणार आहे.
शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे’च्या व्यवस्थापनाने खेळाडूंच्या तयारीसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
यावेळी उपस्थित असलेले मान्यवर:
अध्यक्ष: सज्जाद अ. करीम सय्यद
सचिव: समीर अ. रज्जाक सय्यद
खजिनदार: श्री. वहाबभाई खलपे
सर्व सभासद, मुख्याध्यापिका श्रीम. सिद्दी लांजेकर व स्टाफ
यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. दोन्ही संघ यावर्षी यशस्वी कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.