जिंदल विद्यामंदिर येथे स्काऊटस – गाईड्स राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबीर उत्साहात संपन्न
रत्नागिरी (प्रतिनिधी )
जिल्ह्यातील दक्षिण विभागाचे स्काऊट गाईड राज्यपाल पुरस्काराचे एकदिवसीय स्काऊटस – गाईड्स राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबीर जिंदल विद्यामंदिर येथे उत्साहात संपन्न झाले.
रत्नागिरी जिल्हा भारत स्काऊट आणि गाईड आयोजित स्काऊट – गाईड स्काऊटस – गाईड्स राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबीर चाचणी शिबीर जिंदल विद्यामंदिर येथे दि. १० रोजी उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाले .
सदर प्रशिक्षणात राज्यपाल पुरस्कारासाठी आवश्यक प्रविण्यपदकांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यामंदिरचे पर्यवेक्षक दिपक दरडी यांनी उपस्थित मार्गदर्शक व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले . जिल्हा स्काऊट संघटक रमाकांत डिंगणे यांनी प्रस्ताविक केले .त्यानंतर स्काऊट विभागाचे ट्रेनर शिक्षक दिनेश नाचणकर व एअर स्काऊट मास्टर प्रशांत जाधव यांनी ध्वजारोहण ,प्रार्थना , नियम , ध्येय्य , वचन , विविध बांधण्या / गाठी , अंदाज अशा विविध घटकांसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच गाईड कॅप्टन संजू शर्मा यांनी गाईड ध्वजारोहण तर प्रज्ञा मेढेकर यांनी गाईड प्रविण्यपदके यांविषयी मार्गदशन केले . उपस्थितांपैकी शिर्के प्रशालेच्या नानल गुरुकुल तसेच जिंदल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कृतीशील सहभाग नोंदविला . सदर प्रसंगी आभारप्रदर्शन फ्लॉक लीडर मैथिली मोरे यांनी केले. वंदेमातरम राष्ट्रीय गीत गायनाने चाचणी व प्रशिक्षण शिबीराची सांगता करण्यात आली . राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबीराच्या यशस्वीतेसाठी सेविका सौ कांबळे शिक्षक श्री विनोद आदींनी प्रयत्न केले.