देवरुख येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा
१ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ः देवरुख (ता. संगमेश्वर) येथील चाफ्याचा पऱ्या येथे पोलिसांनी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारुवर मोठी कारवाई केली. या कारवाई साहित्यासह १ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण रावजी पर्शराम (वय ६०, रा. पर्शरावाडी, देवरुख ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) दुपारी पावणेतीनच्या सुमारास देवरुख-पर्शरामवाडी येथील चाफ्याचा पऱ्या या ठिकाणी जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पर्शरामवाडी येथील चाफ्याच्या पऱ्या येथे कारवाई केली. त्यावेळी संशयित विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु गाळत असताना सापडला. त्यांच्याकडून ७ हजार ७०० रुपयांचे २०० लिटरचे पत्र्यांचे बॅरल, १५० लिटर गरम गुळ नवसारगर मिश्रीत कुजके रसायन, ५०० रुपयांचा चाटू, २ हजार ७०० रुपयांचे २५ लिटर दारु, ८० हजार ची २०० लिटरची ८ प्लास्टिकची बॅरल, १ हजार ६०० रुपयांचा गुळ नवसार मिश्रीत तयार केलेले कुजके रसायन, २ हजार ५०० रुपयांचे ५०० लिटरचे बॅरल, ५ हजार रुपयांचे बॅरल असा एकूण १ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल सत्यजित दरेकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.