रनप सार्वत्रिक निवडणूक; पाचव्या दिवशी आणखी एक अपक्ष उमेदवारी दाखल
रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी अद्यापही अपेक्षित उत्साह दाखवलेला नाही. पाचव्या दिवशी एक उमेदवारी दाखल करण्यात आला. अद्याप पर्यंत तिघा अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी मात्र अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
नगरसेवक पदाच्या 32 जागांसाठी आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 10 तारीख पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. पाच दिवसात केवळ नगरसेवक पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी योगेश हळदवणेकर यांनी प्रभाग 2 मधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून अंतिम दिवसात उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.