बेकायदेशिरपणे गावठी दारुची वाहतुक करणाऱ्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेकायदेशिरपणे गावठी दारुची वाहतुक करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 12 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वा.मांडवी चौपाटी ते नाईक फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
सुयोग दत्ताराम राउत (23,रा.तेलीवाडी मालगुंड,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल अमृत औघडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,संशयित हा मांडवी चौपाटी ते नाईक फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या ताब्यातल दुचाकी (एमएच-08-बीबी-6071) मधून 800 रुपयांचा 10 देशी दारुच्या बाटल्यांची वाहतुक करताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 60 हजारांची दुचाकी आणि 800 रुपयांची दारु असा एकूण 60 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई),82 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.