मिरजोळे-पाटीलवाडी येथे हातभट्टीवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदी किनारी जंगलमय भागात गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत दारुसाठी लागणारे गुळ व नवसागर मिश्रीत रसायन व इतर साहित्य असा एकूण २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदेश गणपत जाधव (५३, रा. मिरजोळे, बौध्दवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १०) सकाळी सव्वा सातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
संशयित हा मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदी किनारी जंगलमय भागात बेकायदेशिरपणे हातभट्टीची दारु बनविण्यासाठी लागणारे २०० लिटर गुळ नवसागर मिश्रीत कुजके रसायन व इतर हातभट्टीचे साहित्य स्वतःताकडे बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिस हेड काँस्टेबल उमेश पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.