दुचाकीस्वार तुषार पवारचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड: मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळ पार्ले येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुषार अशोक पवार (रा. खेड) या तरुण दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महाड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत तुषार कार्यरत होता. रात्रपाळीचे काम आटोपून तो दुचाकीने घरी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने पनवेल येथील कामोठे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे खेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे