रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील उमरे गावच्या रेल्वेच्या ओव्हर ब्रिजवर राजधानी एक्स्प्रसची धडक लागून तरुणाचा मृत्यू झाला. स्वरुप दयानंद कांबळे (वय ३०, रा. उमरे कांबळेवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ८) दुपारी साडेतीनच्या सुमारास उमरे गावच्या ओव्हरब्रीजवर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वरुप कांबळे याला उमरे गावच्या ओव्हरब्रीजवर राजधानी एक्स्प्रेसची धडक झाली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.