रहदारीस व वाहतूकीस अडथळा ; संशयित चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील मारुती मंदिर ते नाचणे रस्त्यावर वाहतूकीस व रहदारिस अडथळा करणाऱ्या चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस लक्ष्मण निकम (वय २९, रा. बाजारपेठ सावर्डे, ता. चिपळूण) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ६) सायंकाळी सातच्या सुमारास नाचणे रोडवरिल लोकमान्य टिळक सहकारी पतसंस्थे इमारती समोरिल रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तेजस निकम यांना मोटार (क्र. एमएच-०४ एफ ए ३५३७) ही सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशी उभी करुन ठेवली. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अमिता पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.