अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील तोणदे येथील नवलाई मंदिराच्या बाजून जाणाऱ्या रस्त्यावरिल वडाच्या झाडाजवळ गांजा सदृश्य अमंली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल भिकाजी आग्रे (वय २७, रा. हनुमानवाडी, तोणदे, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित साहिल आग्रे हा तोणदे येथील नवालई मंदिराच्या बाजून जाणाऱ्या छोट्या रस्त्याच्या बाजूला वडाचे झाडाजवळ गांजा सदृश्य अमंली पदार्थाचे सेवन करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हवालदार रोशन सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.