बस चालकाने गाडीला ब्रेक केल्याने तरुणी जखमी
रत्नागिरी ः एसटी बस चालकाने बसला ब्रेक केल्याने प्रवासी तरुणी बसमध्येच जखमी झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहिणी जयराम जाधव (वय २३, रा. खडीकोळवण, ता. संगमेश्वर) असे जखमी तरुणीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दाभोळे येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी रोहिणी जाधव या कोल्हापूर गणपतीपुळे या एसटी बसने साखरपा ते पाली येत असताना दाभोळे रस्त्यावर एसटी बस चालकाने अचानक ब्रेक केला. त्यामुळे बसमध्ये उभे असलेले प्रवासी तिच्या डाव्या पायावर पडल्याने तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.