दापोलीत नागालँडच्या तरुणाकडून 4 गाड्यांची तोडफोड
दापोली
दापोली शहरात रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत नागालँडमधील एका तरुणाने चार चारचाकी वाहनांच्या काचा फोडून तोडफोड केली. तसेच दहा-बारा दुचाकी वाहनांना ढकलून रस्त्यावर पाडल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी विलोका व्ही. सुनी (वय 20, मूळ रा. इगोटे, ता. सिटीमेड डाऊन, जि. किफिरे, नागालँड; सध्या रा. पोस्टाची गल्ली, दापोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची मानसिक स्थिती तपासण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे.
योगेश दत्तात्रय वैद्य यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या एर्टिगा कारसह सुशील मिसाळ यांच्या वॅगनआर कारचे नुकसान झाले. ही घटना 2 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 3 नोव्हेंबरच्या सकाळीपर्यंत खोत गल्ली आणि पालकर कॉम्प्लेक्स परिसरात घडली.
दापोली पोलिसांनी सांगितले की, सुनी याने जांभा दगडांनी गाड्यांच्या काचा फोडल्या असून, अंदाजे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढील तपास सुरू आहे