सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुलच्या बाजुला सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुअज्जम हसन खान (४६, रा. पडवेकर कॉलनी उद्यमनगर, रत्नागिरी) आणि संदिप एकनाथ साळवी (५५ रा. मधलीवाडी टेंभ्ये, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता.३०) सायंकाळी साडेसहा ते सात या कालावधीत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे मद्यपान करत असताना आढळले या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे व पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.