स्कूल समोरिल रस्त्यावर मद्यपान ; वृद्धाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील एका स्कूलच्या समोरिल रोडवर बांधाच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिकाजी महादेव वासावे (वय ६०, रा. जांभारी वासावेवाडी, रत्नागिरी) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २९) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र आठवले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.