सावर्डे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विभागीय कार्यालयाचे झाले उदघाट्न
सावर्डे: येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विभागीय कार्यालयाचे उदघाट्न माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार भास्करशेठ जाधव यांच्या शुभ हस्ते काल दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 4.30 वाजता झाले. सावर्डे विभाग हा राजकीय दृष्ट्या फार महत्वाचा मानला जातो. तालुक्यातील राजकीय हॉटस्पॉट म्हणायला हरकत नाही. अश्या या सावर्डे विभागात विभागात कार्यालय सुरु होणे हे कार्यकरत्याच्या दृष्टीने एक पर्वणीच आहे.
सावर्डे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी आठवडा बाजार येथे हे कार्यालय सुरु झाले आहे. आजूबाजूच्या 45 गावातील शिवसैनिकांच्या संपर्काचे माध्यम झाले असून या माध्यमातून संघटना मजबुती व समजसेवेचे कार्य अविरत चालू रहाव्यात अश्या शुभेच्छा माननीय नेते आमदार भास्करशेठ जाधव यांनी दिल्या आहेत, तसेच काम करतो असताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. आमदार भास्करशेठ जाधव यांच्या सावर्डे येथील कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व चैतन्यचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते भास्कर शेठ जाधव, शिवसेना उपनेते बाळ माने, जिल्हा प्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक राजू शेठ देवळेकर, युवासेना तालुका प्रमुख उमेशजी खाताते, शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन शेटे, राजाशेठ नारकर, माजी पंचायत समिती सदस्य संतोष चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव,चिपळूण शहर प्रमुख भैया कदम,शहर सचिव प्रशांत मुळ्ये, युवा सेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, महिला आघाडी उपजिल्हा अध्यक्ष धनश्री ताई शिंदे, क्षेत्र अध्यक्ष रुमाताई देवळेकर, तालुका अध्यक्ष मानसी भोसले, युती सेना प्रमुख शिवानी कासार हे उपस्थितीत होते. त्याच प्रमाणे विभागातील जेष्ठ शिवसैनिक बाळशेठ पंडित, सुशिल सावंत, सुनिल जाधव, संजय कोकाटे, बावाशेठ राजेशीर्के, अकलाख शेख, राजू गुरव, बाबुदा गुडेकर, दत्ता उदेग, सुनिल गुरव, विष्णू चव्हाण, सुरेश वाघे, असुर्डे विभाग प्रमुख अजित गुजर, युवासेना विभाग अधिकारी विशाल परकर, खामकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.
या कार्यालयाच्या उभारणीसाठी विभागाचे उपतालुका प्रमुख संदीप राणे, सावर्डे विभाग प्रमुख सागर सावंत, मांडकी विभाग प्रमुख रमेश कुंभार, उपविभाग प्रमुख रमेश राजेशीर्के , उपविभाग प्रमुख संदीप चव्हाण, शाखाप्रमुख सुभाष राडे, विवेक सुर्वे, नयन कुळे, कृष्णा (नाना) हुमणे, तेजस घाणेकर, निलेश डिके, अमोल पिरधनकर, रुपेश घाग, मयूर घाग, शशी राणीम, निलेश भुवड, विनायक वास्कर,नियाज शेठ चिकटे, राजू गुरव, युवसेना विभाग प्रमुख भूपेश सावर्डेकर, नवनियुक्त विभाग प्रमुख धनराज वरेकर, या सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मेहनत घेतली आहे.