लोटेतून कंपनीसमोरील दुचाकी चोरीस
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभी करुन ठेवलेली ५५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्याने चोरुन नेली. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
निखिल दत्ताराम कराडकर (रा. हशेल्डी-कराडकरवाडी, सध्या असगणी-समर्थनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ०८/एझेड २६३७) कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी करुन ठेवली होती. कामावरुन परतल्यानंतर ती जागेवर नसल्याची बाब लक्षात येताच पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.