चिपळुणात दुचाकीची कारला धडक
चिपळूण : भरधाव वेगातील दुचाकी चालकाने एका कारला धडक दिल्याची घटना बुधवारी गुहागर मार्गावरील तांबी पूल येथे घडली. यात दोघेजण जखमी झाले असून या प्रकरणी दुचाकी चालकावर गुरुवारी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम यशवंत कदम (६०, पाटपन्हाळे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याची फिर्याद अजय रामचंद्र शिंदे यांनी दिली. या अपघातात अजित अनंत कदम (४०, पाटपन्हाळे) व पुरुषोत्तम कदम हे दोघेजण जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, पुरुषोत्तम कदमने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. यात दुचाकी चालक पुरुषोत्तम कदम तसेच त्याच्या दुचाकीच्या पाठीमागे बसलेला अजित कदम हे दोघेजण जखमी झाले. शिवाय दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. या प्रकरणी पुरुषोत्तम कदमवर गुन्हा दाखल झाला आहे.