सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी
तालुक्यातील चांदेराई येथील प्रौढ सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आला. संशयित प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश धरमू शिंदे (वय ५०, रा. चांदेराई-डोंगरवाडी, रत्नागिरी) असे संशयित प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास चांदेराई येथील एका बिअर शॉपीच्या पाठीमागे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित प्रकाश शिंदे हे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.