कशेडी बोगद्याजवळ अपघात; डंपर चालकावर गुन्हा
खेड:
मुंबई-गोवा महामार्गावरील, कशेडी बोगद्याजवळ कारला धडक देत अपघात केल्याप्रकरणी डंपरचालक जितू नागेश कापा (रा. आंध्रप्रदेश) याच्यावर बुधवारी रात्री येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रफुल्ल वासुदेवराव सिनकर (४०, रा. आंबेगाव-पुणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ते आपल्या ताब्यातील कार (एमएच १२ वायडी ९३४८) घेवून खेडहून मुंबईच्या दिशेने जात होते. याचवेळी कशेडी बोगद्याजवळ आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या डंपर (एमएच ११ सीएच १४२९) चालकाने त्यांना धडक दिली. या प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.