बिबट्याच्या हल्ल्यात २ गुरे जखमी, १ ठार
खेड: तालुक्यातील खोपी-बौद्धवाडी येथे बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, हा बिबट्या आता मानवीवस्तीतही शिरू लागला आहे. ११ ऑक्टोबरला रात्री २ ते २.३० च्या दरम्यान शेतकरी अमोल शंकर मोहिते यांच्या गुरांच्या वाड्यात शिरला आणि त्याने ३ गुरांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात २ गुरे जखमी झाली असून, एक जनावर ठार झाले. ही घटना १२ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता निदर्शनास आली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.