को.रे. चे पावसाळी वेळापत्रक २० रोजी संपुष्टात
खेड
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करून प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने १५ जूनपासून लागू केलेले पावसाळी वेळापत्रक यावर्षी २० ऑक्टोबर रोजी संपुष्टात येणार आहे. दरवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रकानुसार पावसाळी रेल्वेगाड्या धावत होत्या. यावर्षी ११ दिवसांचा कालावधी कमी झाल्याने प्रवाशांची विलंबाच्या प्रवासातून सुटका होणार आहे.
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर ६७६ कर्मचाऱ्यांची दिवस-रात्र गस्त सुरू आहे. मडगावमध्ये २४ नियंत्रण कक्ष कार्यरत असून असुरक्षित ठिकाणी २४ तास कर्मचाऱ्यांच्चा जागता पहारा सुरू आहे. दरवर्षी १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करून रेल्वेगाड्या धिम्या गतीने धावत होत्या. यंदा जूनपासून पावसाळी अंमलबजावणी १५ वेळापत्रकाची करण्यात आली.
१५ जूनपासून रेल्वेगाड्यांचा वेग मंदावला आहे. यामुळे प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागत आहे. यंदा २० ऑक्टोबरपर्यंतच पावसाळी वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. यामुळे पावसाळी वेळापत्रक संपुष्टात आल्यानंतर रेल्वेगाड्या नियोजित वेगानुसार धावणार आहेत. यासाठी आणखी १४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.