कोंढेतड भंडारवाडीमधून दुचाकी चोरीस
राजापूर : तालुक्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील कोंढेतड-भंडारवाडी परिसरातून एका चोरट्याने काळ्या रंगाची दुचाकी चोरून नेली. तिची सध्याची बाजारातील किंमत दहा हजार रुपये आहे. गणेश कृष्णा तेली रा. खारेपाटण-रामेश्वर नगर, सिंधुदुर्ग) यांनी दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली आहे. तेली त्यांनी काळ्या रंगाची मोटारसायकल कोंढेतड-भंडारवाडी येथे उभी किरून ठेवली होती. चोरट्याने ती . चोरून नेली. हा प्रकार ९ ते १० ऑक्टोबर या कालावधीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन चोरट्याविरोधात गुन्हा *दाखल केला. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी महामार्गावर लिफ्ट देिण्याच्या बहाण्याने एका वाहन चालकाने एका महिलेला लुटल्याचा प्रकार घडला. त्या चोरीचा उलगडा करून त्यातील संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे सतत होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.