चिपळुणात राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी
चिपळूण : चिपळूण नगरपरिषद निवडणूकी मध्ये महायुती होण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावा. युती होत नसेल तर पक्षाच्या स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी दर्शवली.
या बैठकीमध्ये आमदार शेखर निकम यांनी सांगितले की इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे मागिवले जातील त्याकरिता एक पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्यात येईल.या बोर्डाचे प्रमुख प्रांतिकचे उपाध्यक्ष शौकत मुकादम असतील. विकास कामाचा विचार केला तर नगरपरिषद आपल्या ताब्यात घ्यायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असेही ते म्हणाले.
बैठकीच्या सुरुवातीला बँकेचे चेअरमन संजयशेठ रेडिज व इतर व्यक्तींचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या वकिलाची देखील निषेध करण्यात आला..त्या बैठकीमध्ये आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना अनेक महत्त्वाचे विषय मांडले.. प्रांतिक उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून निवडणुकीमध्ये पेटून उठून काम केले पाहिजे व बॅनर लावून पक्ष मोठा होत नसतो, घरोघरी मतदारांशी संपर्क साधली पाहिजे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आपल्याला निवडणुकीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही असे ते म्हणाले. तसेच तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की, कार्यकर्त्यांनी एकजुटीने व झटून काम केले पाहिजे.या निवडणुका आपल्या कार्यकर्त्यांच्या आहेत असेही ते म्हणाले..
या बैठकीमध्ये प्रांतिकाचे सरचिटणीस जयद्रथ खताते,तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी अशा अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीमध्ये सूत्रसंचालन कार्याध्यक्ष उदय ओतारी यांनी केले..
चिपळूण नगर परिषदेतील 14 प्रभागाचा आढावा कार्यकर्त्याकडून घेण्यात आला..सदर बैठकीला पूजा निकम, निलेश कदम,रियाना बिजले, जाकिर भाई शेख, आसन रफिक भाई सुर्वे, सलीम पालोजी, आदित्य देशपांडे, किशोर रेडीज, उदय ओतारी, मनोज जाधव, सचिन पाटेकर,सचिन साळविलकर ,शिवानी पवार, सलीम पालोजी, वर्षा जागुष्टे,फैरोजा मोडक, विनायक पवार, डॉक्टर राकेश चाळके, दिशाताई दाभोळकर, योगेश पवार, बिलाव पालकर,विशाल जाणवलकर, नसरिन खडस, संदीप चिपळूणकर, खालीद दाभोलकर, बरकत पाते,इम्रान खतीब,अनिकेत ल्हाद यादव, वैभव रेडीज व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.