एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल रोहन मयेकर यांचा सत्कार
रत्नागिरी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जबाबदारीचे पद स्वीकारलेल्या रत्नागिरीचे सुपुत्र रोहन राजेंद्र मयेकर यांचा ९ ऑक्टोबर रोजी विशेष सत्कार करण्यात आला. रोहन मयेकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
रोहन मयेकर यांनी प्रशासकीय सेवेत मिळालेल्या संधीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कौटुंबिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर ओबीसीचे अध्यक्ष अमित विलणकर यांच्यासह भाई विलणकर, मुकुंद विलणकर, विलास विलणकर, अजय विलणकर, कमलाकर जोशी, अमर विलणकर, तसेच रोहन यांचे वडील राजेंद्र मयेकर यांनी रोहन यांच्या प्रशासकीय सेवेतील प्रवेशाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन प्रशासकीय जबाबदारीसाठी उपस्थित मान्यवरांनी रोहन मयेकर यांना पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.