मारुती मंदिर सर्कलजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून दुचाकीस्वाराला धडक देत अपघात करणाऱ्या अज्ञात महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. सुमारास मारुती मंदिर सर्कल येथील व्यंकटेश हॉटेलसमोर घडली.
याबाबत रघुनाथ बाबी झोरे (49, रा. साईश्वरी अपार्टमेंट हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी रघुनाथ झोरे हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन खेडशी ते मारुती मंदिर असे येत होते. त्याच सुमारास एक अज्ञात महिला तिच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने घेउन मारुती मंदिर ते नाचणे अशी जात होती. ही दोन्ही वाहने व्यंकटेश हॉटेलसमोर आली असता कारची धडक झोरे यांच्या कारला बसून हा अपघात झाला. त्यामुळे झोरे दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर चालक महिलेने त्यांची माफी मागून अपघाताची कोणतीही खबर व वैद्यकिय सेवा न देता काढता पाय घेतला.