निवळी – जयगड महामार्गावर अवजड वाहतूक धरली रोखून
वाढते अपघात रोखण्याची ग्रामस्थांची मागणी
रत्नागिरी
मागील काही महिन्यात जयगड ते हातखंबा या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढलेले पहायला मिळत आहे. जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून या रस्त्यावरून अवजड वाहनांकडून कोणतीही कोणतीही खबरदारी न घेता मालवाहतूक राजरोस सुरू आहे. जीवघेणे अपघात होताहेत, पण प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना होत नसल्याने मंगळवारी जयगड रस्त्यावर खंडाळा सामाजिक संस्थाया नेतृत्वाखाली ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. मार्गावरून डंपरद्वारे होणारी अवजड वाहतूक रोखून धरत ग्रामस्थांनी मागे न हटण्याचा निर्धार केला.
प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेचे हे बळी जात असल्याचा खळबळजनक आरोप जयगड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी यावेळी केला आहे. साधारणत 2005 पासून जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून या रस्त्यावरून माल वाहतूक करणाऱया वाहनांची सुरवात झाली. सुरवातीला या दोन्ही पोर्ट ची व्याप्ती कमी प्रमाणात असल्यामुळे फारसा त्रास जाणवत नव्हता. मात्र मागील 10 वर्षात या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात माल वाहतुकीला सुरुवात झाली. तुलनेने रस्ता जसा आहे तसाच आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक, खराब रस्ते व चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे या रस्त्यावर महिन्यातून किमान एका तरी निष्पाप नागरिकाचा बळी जात आहे. यावर प्रशासनाकडून मात्र कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसण्यात येत नाही.
नुकता हातखंबा मध्ये एक भीषण अपघातांत 20 वर्षीय तरुणाचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक जण त्यामधे जखमी आहेत. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांन मध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. या रस्त्यावर अनेक शाळा, महाविद्यालये देखील आहेत त्यामुळे या शाळेत महाविद्यालया मध्ये येणारे पालक देखील चिंतेत आहेत. अनेकदा या रस्त्यावर मालवाहतूक करण्राया बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक ठप्प असते. एकंदरीत या सर्व कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. या सर्व गोष्टी समोर ठेवून येत्या काही दिवसात या परिसरात स्थानिक नागरिकांच्या रोषातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन देण्यात आले होते.
तरीही या अवजड वाहतूकीवर बंधने घालण्यात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर जयगड-वाटद मार्गावर ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. संतप्त ग्रामस्थांनी या मार्गावरून होणारी बेखबरदारपणे डंपरी मालवाहतूक रोखून धरली. त्यामुळे परिसरात तणावो वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने पोलीस फौजफाटाही तातडीने दाखल झाला. प्रथमेश गवाणकर यांया नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले, त्यामध्ये पांक्रोशीतील मोठय़ा संख्येने ग्रामस्थांनी सहभाग दर्शवला होता. या आंदोलनकर्त्यीं समजूत काढण्या प्रयत्न पोलिसांमार्फत करण्यात आला.
पण प्रशासनाकडून जोपर्यंत या अवजड वाहतूकीवर निर्बंध लावत नाहीत तोपर्यंत याठिकाणहून मागे न हटण्या पवित्रा घेण्यात आला होता. या मार्गावर अशाप्रकारे खुलेआम अवजड वाहने ााालणार असतील तर येथून या गाडय़ा जाउ देणार नसल्यो प्रथमेश गवाणकर यांनी ठणकावले. पोलिसांनी त्यांया पध्दतीने कारवाई करावी. पण अशाप्रकारे जर अवजड वाहतूक लोकांया जीवावर उठणार असेल तर आम्ही मेलो की, पांनामे करायला यावे असे सांगण्यात आले. प्रशासनाकडून कारवाई तात्पुरती नको तर कायमस्वरूपी केली जावी. त्यासाठी ट्रान्स्पोर्टवाल्या मालकांना बोलावून घेण्यात यावे. हे आंदोलन जनताया हितासाठी आहे, त्यामुळे प्रशासनाने आमी बाजू समजून घ्यावी. जोपर्यंत या वाहतूकीवर लगाम घातला जात नाही तोपर्यंत माने न हटण्या निर्धार खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था अध्यक्ष गवाणकर व त्यांया सहकारी ग्रामस्थांनी केला होता.