टीडब्ल्यूजे कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तत्काळ संपर्क करा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
‘टीडब्ल्यूजे असोसिएटस’ या कंपनीतील गुंतवणूकीतून फसवणूक झालेल्या नागरिकांनी तातडीने रत्नागिरी पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार नोंदवावी असे आवाहन रत्नागिरी पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.
या कंपनीविरोधात 22 सप्टेंबर 2025 रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 316(2),318(2),318(3),318(4),3(5) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 चे कलम 3,4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी पोलिस दलाची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.