दामले विद्यालयाला राज्यस्तरीय प्रेरणादायी शाळा पुरस्कार प्रदान
श्रद्धा गांगण सक्षम महिला पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी, : महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या ७ व्या शिक्षक गुणगौरव समारंभात सातारा येथील कार्यक्रमात आज रत्नागिरीच्या दामले विद्यालयाला राज्यस्तरीय प्रेरणादायी शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत सन्मान प्रदान सोहळा पार पडला .* यावेळी दामले विद्यालयाच्या सौ . श्रद्धा गांगण यांना राज्यस्तरीय सक्षम महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला . दामले विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात आपल्या गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणामुळे नावारुपाला येत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात मोठी शासकीय पटाची शाळा बनण्याचा मान मिळवला आहे . नावीन्यपूर्ण उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षांमधील यश, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात शाळेने केलेले सातत्यपूर्ण काम यांचा गौरव म्हणून शाळेची निवड झाली . शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री . भगवान मोटे आणि सहकारी शिक्षकांनी हा पुरस्कार आज स्वीकारला . शाळेच्या विकासासाठी आणि पट वाढीच्या प्रयत्नांत सदोदित आग्रही असणाऱ्या, तसेच शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शनाबद्दल सौ . गांगण यांना गौरविण्यात आले . शाळेच्या या यशाबद्दल प्रशासन अधिकारी श्री . सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . मिलिंद संसारे आणि समिली सदस्यांनी अभिनंदन केले आहे .