लोटेमाळ येथे तरुणाचा मृतदेह आढळला
खेड : तालुक्यातील लोटेमाळ येथील हॉटेलसमोर असलेल्या कंपाऊंडच्या पत्र्याच्या शेडमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. चंदन सखाराम कदम (वालोटी-चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत लोटेमाळ येथील आराधना रेस्टॉरंटचे मालक अमित काते यांनी येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.