बिबट्याच्या हल्ल्यात दोन जनावरे जखमी
लांजा : लांजा तालुक्यातील खेरवसे-ढववाडी येथे शुक्रवारी (ता. ३) मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन पाळीव जनावरे जखमी, तर एक पाडा ठार झाला. खेरवसे येथील सुरेश कोकरे या शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने हा हल्ला केला. खेरवसे परिसरात गेली अनेक दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
…..