दुगम भागात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
रत्नागिरी : माचाळ मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. विनोद जाधव यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी च्यावतीने मौजे माचाळ येथे विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. आर. आर. पाटील, गटविकास अधीकारी लांजा श्री. एच. वी. गिरी, तहसिलदार लांजा श्रीमती प्रियांका ढोले, जेष्ठ विधिज्ञ श्री. संकेत तुकाराम ढवळ, श्री. झिमन, माचाळ मुचकुंडी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक श्री. विवेक सांवत, सरपंच श्री. गाडे, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्री. ढवळ यांनी ग्रामस्थांना कुळ कायद्या विषयी माहिती सांगितली, तहसिलदार श्रीमती प्रियंका ढोले यांनी महसूल खात्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून राबविण्यात येणाऱ्या योजना मोफत कायदेविषय सल्ला व सहाय्य याबाबत श्री. पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.