तांब्याची भांडी दापोलीत चोरीला
दापोली : शहरातील दापोली बस स्थानकामागे असलेल्या जुन्या ऊर्दू शाळेच्या इमारतीमधून जमातुल मुस्लिम कोड या जमातीची ऐतिहासिक तांब्याची भांडी चोरीला गेली आहेत. अंदाजे ८० हजार रुपये त्याची किंमत आहे. २८ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास ही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भांड्यांची अनेक वर्षांपासून जुन्या इमारतीत जपणूक करण्यात आली होती. नेमकी कोणी व कशा प्रकारे ही चोरी केली, याचा तपास पौलिस करत आहेत. पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासणी व स्थानिकांची चौकशीही सुरू केली आहे.